👊🏻 *शिक्षक हीच माझी जात*👊🏻
✍🏻 *लक्ष्मण द. सावंत*
*शिक्षक आपुली जात अन्*
*शिकवणे आपुले कर्म आहे !*
*आणिक नको जाती युद्ध*
*भारतीय आपुला धर्म आहे !!*
*ज्ञानरचनावादाची कास धरा*
*व्यर्थ विचार हो बाजुला सारा*
*रंगारंगात विभागू नका तुम्ही*
*झेंडा फक्त ज्ञानाचा उंच धरा*
*इवलेशे जीव आपुल्यात रमती*
*जात कुठं त्यांना सांगा कळते*
*स्वजातीसाठी तुमचे बोट मग*
*मोबाइलवर चांगलेच चालते?*
*विष जातीचे पसरवू नका हो*
*रोप ज्ञानाचे आता रूजवा की*
*बंधुभावाला मनामनात पेरून*
*एकात्मतेची मशाल पेटवा की*
*रंग विभिन्न हवेतच कशाला*
*रंग रक्ताचा जर एकच असेल*
*जातीजातीत विष पसरवणारा*
*शायद शिक्षक जातीचा नसेल*
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.के.प्रा.शाळा पाल,औरंगाबाद*
*9403682125*
*ldsawant.blogspot.com*
No comments:
Post a Comment