🙏शाळेत काम करत असतांना आपण सारेच सर्वपरीने प्रयत्न करीत असतो.पण तिथ काम करीत असतांना काय काय समस्या येतात हे आपल्यालाच ठाऊक असतो.
सर्वत्र खो खोचा खेळ चालू असतो शासनापासून तर शिक्षकापर्यत पण आपल्याला खो द्यायला पुढे कोणीच नाही .कारण सर्व नियम कायदे शिक्षकांसाठी आहे पालकांसाठी काहीच नाही. शिक्षक मनापासून प्रगतीच्या वाटेवर लागलेला आहे तळमळून काम करत आहे पण ऐनवेळी एखादा पालक येतो आणि मुलाला घेऊन गावाला निघून जातो
खूपच घुसमट होते पाहिलय मी अनेकांना अस्वस्थ होतांना.... मन मानत नाही खोटी हजेरी भरायला....
पण नियमांचे मनावर दडपण येते अन ...एक अगतिकताही आली आहे जीवनात अजून प्रभाराचा काही अजून अनुभव नाही पण ज्याच्याकडे आहे त्यांच्या चेहर्यावरून दिसते ती घुसमट जगण्याची.
नाव जरी सरल असल तरी ती प्रणाली काही एवढी सरल नाही एकतर शाळांमधे एवढ्या भौतिक सुविधा नाही तंत्रज्ञानाची एवढी प्रशिक्षणेही नाही मग कोणत्या बळावर सरकार आमच्याकडून ह्या अपेक्षा करत आहे?
परवाच दिवशी दवाखान्यात गेलो होतो तिथ एक वाक्य असते लिहलेल ते किती वेळा वाचल पण प्रत्येकवेळी नवीन अर्थ कळतो. तिथ स्वामी विवेकानंद म्हणतात की डाॅ हा काही देव नाही तो प्रयत्न करीत असतो तो ही चुकू शकतो मग आमचे काय? आम्ही माणस नाही काय?
एखाद्या शेतकर्याला जर सांगितले की तू तुझ्या पिकांचा वाढीचा दररोज रिपोर्ट दे कोणत्या कपाशीच्या झाडाला किती कैर्या आल्या कोणाची ची किती प्रत्पेकातील अंतर किती तर खर सांगा तो शेतात काम करू शकेल काय? मग शिक्षकांकडूनच सर्वांना एवढ्या अपेक्षा कशा?
शिक्षक हा समाजशील आहे समाजातील भावभावना तो समजून घेतो कारण तो एक दुवा असतो समाजाचा पण हेही विसरता कामा नये की तोही भाग आहे एका कुटुंबाचा .शाळेला सुट्टी लागायच्या दोन दिवस आधीचीच गोष्ट माझ्या वर्गात एक मुलगी आहे ती तिच्या आजीआजोबांबरोबर राहते गावी मजूरी नसल्यामुळे तिचे आईबाबा पुण्याला काम करत असतात. दिवाळीच्या चार दिवशी आधी ते गावाला आले. शाळेत येऊन म्हणाले मी मुलीला घेऊन दोन दिवस गावाला जातो. काय करणार अशा क्षणाला नाईलाजच असतो .पालकांची भांडण होतात,त्यांच्या काही श्रद्धा असतात,त्यांच्याकडे पाहूणे येतात
आणि भावंडांना वागविणे व त्यांचे आजार सार काही जलचक्रासारख सुरूच असते.सार काही सांभाळता सांभाळता नाकेनऊ येतात.
पण व्यथा सांगणार कोणाला?एकीकडे आमच्यावर पूर्ण विश्वास टाकतात अन दुसरीकडे कागद अन कागद मागतात.सरलच्या या उपस्थितीच्या प्रणालीला वेळीच विरोध करूया. मला संघटनेच्या कामाचाही अनुभव नाही कधी कुठे लेखनही केल नाही पण कुठतरी मनातला होणारा आक्रोश शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकल असेल तर माफ करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रा.विकास पाचरणे
आपणांस विविध शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल
LINK LIST
- HOMEPAGE
- विज्ञान छोटे प्रयोग
- Inspired Award
- किशोर मासिक
- महाराष्ट्र शासन
- आदर्श ध्वजसंहिता
- आजच्या ताज्या बातम्या
- अहमदनगर जिल्हा परिषद
- इ साहित्य (पुस्तके PDF)
- परिपाठ गीते Download
- वाचनीय पुस्तक यादी
- सुविचार संग्रह
- शालेय क्रमिक पुस्तके (1 ली ते 12 वी)
- शाळा अभिलेखे यादी
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
- भारतीय डाक विभाग
- हस्तलिखित गीत संग्रह (ऑडियो)
Thursday, 3 November 2016
वाचनीय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment