भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१].नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.
😊२६ नोव्हेंबर : संविधान दिन😐
१. जब तक सूरज चाँद
तब तक संविधान
२. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
३. समता, बंधुता, लोकशाही
संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान
मिळवून देते संविधान
५. संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
६. संविधानावर निष्ठा
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती
देई आम्हा अभिव्यक्ती
८. मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
९. संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू
१०. सर्वांचा निर्धार
संविधानाचा स्वीकार
११. संधीची समानता
संविधानाची महानता
१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१३. संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान
१४. लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
१५. संविधानाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
१६. भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
१८. नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
२०. सबसे प्यारा
संविधान हमारा
२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
२२. संविधानाची महानता
विविधतेत एकता
२३. देशभरमे एकही नाम
संविधान! संविधान!
२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
२६. लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
२७. तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
ये देश चलता है संविधान से!
२९)दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता
३०)समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची
३१)स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय
३२)संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
३३)संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी
३४)ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो
३५)जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू
३६)संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे
३७)संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान
३८)संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
३९)संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत
४०)घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे
४१)अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा
४२)भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान
४३)स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता
४४)वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी
४५)बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान
४६)लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान
४७)भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
४८)समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या
४९)सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान
५०)संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण
५१)आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार
५२)संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार
५३)हक्क बजावू, कर्तव्य पाळू
प्राणपणाने संविधान सांभाळू
५४)संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही
५५)नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही
५६)भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
संविधान गीत डाऊनलोड करण्यासाठी पुढील शब्दावर क्लिक करा
Download
No comments:
Post a Comment