Monday, 5 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.महापरिनिर्वाण दिन

*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये !!!*

१) "शिका...!
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१८) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१९) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२०) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२१) "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२२) "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment